साहेब मी गद्दार नाही…” राऊत बंधूंचा सामनाच्या जाहिरातीमधून शिंदे गटावर निशाणा
भाजप असो वा शिंदे गट खासदार संजय राऊत सत्ताधाऱ्यांना अनेकदा धारेवर धरताना दिसतात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू संजय राऊत पूर्ण ताकतीनिशी लावून धरताना दिसून येतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात एक जाहिरात दिली आहे. या जाहिरातीद्वारे राऊत बंधूंनी शिंदे गटाला उघड उघड पणे डिवचचल्याचे दिसून येते.
सामनाच्या पहिल्याच पानावर राऊत बंधूंची ही जाहिरात छापून आली आहे. “साहेब मी गद्दार नाही” असा बोल्ड अक्षरातील मजकूर या जाहिरातीमध्ये पाहायला मिळतो. विशेष म्हणजे जाहिरातीवर केवळ बाळासाहेब ठाकरेंचा फोटो छापण्यात आला आहे. त्यासोबत मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असंही लिहिण्यात आले आहे.
“गेलेल्या 40 गद्दारांना गाडून त्याच उमेदीने उभे राहू. तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्या सारख्या शिवसैनिकांना होईल. जय हिंद,जय महाराष्ट्र” असंही या जाहिरातीत म्हंटल आहे. तसेच या जाहिराती खाली संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांचीही नाव टाकण्यात आली आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा