सुप्रसिद्ध नाशिकची मटकी मिसळ आता मालाड मध्ये ; मराठी पाऊल पडते पुढे!!!


मुंबई : प्रतिनिधी

मराठी माणूस हळू हळू का होईना पण एक एक पाऊल पूढे टाकत स्वतःच अस्तित्व निर्माण करत आहे. मराठी माणूस आळशी आहे, मराठी माणूस व्यवसाय धंदा करू शकत नाही, ही खोड आता मोडून काढीत आहे. 

तसही मराठी माणूस उद्योग व्यवसायात कुठेही कमी नाही. लक्ष्मणराव किर्लोस्कर पासून ते हल्ली गल्ली बोळात सुद्धा एक छोटासा का होईना व्यवसाय धंद्यात आपलं नाव कोरले आहे.

त्याच प्रमाणे कोकणी पाडा, मालाड पूर्व, मुंबई येथील 

श्रीमती श्रुतिका, श्री. अमोल खापरे, श्री. रत्नेश पन्हाळकर ह्यांनी काल दिनांक - २० जानेवारी २०२३ रोजी

श्री समर्थ मेजवानी दरबार सुप्रसिद्ध नाशिकची मटकी मिसळ ह्या उपरगृहाचे एका सामान्य मराठी माणसांनी सुरू केले आहे. आपल्या हातात असलेली कला आणि स्वादिष्ट चव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न..! 

त्यांनी दिलेल्या निमंत्रण औचित्य साधून महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या वतीने त्यांच्या उपहारगृहाला भेट देऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले. तसेच संघटना कुठलाही उद्योग व्यवसाय करणार नाही, पण वेळोवेळी काही तज्ञ मंडळींच्या साहाय्याने त्यांना मार्गदर्शन प्राप्त होईल आणि संघटना उद्योग व्यवसायाच्या पाठीशी ठाम उभी राहील.

महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या वतीने संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. धर्मेंद्र चंद्रकांत घाग आणि कांदिवली पूर्व पालिका विभाग -२५ चे अध्यक्ष श्री. चेतन कोलगे postar boy हे उपस्थित होते.

टिप्पण्या