संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील प्रज्वल सनगरेच्या तैलचित्राला राज्यस्तरीय पुरस्कार
संगमेश्वर : प्रतिनिधी
देवरुख कॉलेज ऑफ आर्ट ऍण्ड डिझाईन्स (डी-कॅड) कला महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील कुमार प्रज्ज्वल सनगरे याला स्टील लाईफ या विषयात राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. प्रज्ज्वल सनगरे हा संगमेश्वर तालुक्यातील वांद्री येथील ग्रामीण भागातील विद्यार्थी असून त्याने तैलचित्र प्रकारात हे यश मिळवले आहे. या पुरस्काराचे वितरण पुणे येथे 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
देवरुख कॉलेज ऑफ आर्ट ऍण्ड डिझाईन्सतर्फे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी चित्रे पाठवण्यात आली होती. यामध्ये प्रज्ज्वल याने स्टील लाईफ या विषयावर वस्तू चित्र रेखाटले होते. त्याने परडी, डाळींब, बॉटल्स, आणि ग्रामीण भागातील जार याचे रेखाटलेले हुबेहुब चित्र आकर्षणाचा विषय ठरला. याच चित्राला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातून जवळपास उत्तम प्रकारची अशी 1500 ते 2000 चित्रे आली होती. त्यातून प्रज्ज्वल याच्या चित्राला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या यशाने प्रज्ज्वल याचे कॉलेज सह सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा