ठाणे-नगर अंतर कमी होणार, शहापूरजवळ डोळखांब भागात नवा घाट रस्ता होणार
ठाणे आणि अहमदनगर जिल्हे जोडणारा महत्वाच्या महामार्ग बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
ठाणे आणि अहमदनगर जिल्हे जोडणारा महत्वाच्या महामार्ग बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मागील अनेक वर्षाचा हा रखडलेला रस्ता पूर्ण झाला तर मुंबईतून नाशिकमार्गे किंवा माळशेज घाटातून अहमदनगरला जाण्याऐवजी प्रवाशांना मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील शहापूर येथून धसई, शेणवे, डोळखांब ते अकोले मार्गे थेट अहमदनगर जिल्ह्यात जाता येणार आहे. या मधल्या रस्त्यामुळे नगर जिल्ह्यात जाण्यासाठीचा ६० किमीचा वळसा कमी होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा