जेष्ठ पत्रकार दिलीप जाधव पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित;आमदार संजय केळकर आणि जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या हस्ते सन्मान

खेड : प्रतिनिधी (सुहास खंडागळे)

खेड तालुक्यात गेली अनेक वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले जेष्ठ पत्रकार दिलीप जाधव यांना मराठी वृत्तपत्र लेखक संघ या राज्यस्तरीय संघटनेच्या पत्रकार  भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालय येथील सुरेंद्र गावस्कर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कर्यक्रमात आमदार संजय केळकर,जेष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर आणि संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

दिलीप जाधव हे गेली अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातील विविध वर्तमान पत्रांमध्ये वृत्तसंकलनाचे काम करत आहेत. पत्रकारिता करत असताना त्यांनी विविध विषय हाताळळून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत देखील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेत मराठी वृत्तपत्र लेखक संघ या राज्यस्तरारीय संघटनेचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी घेतली आणि जाधव यांची यावर्षीच्या पत्रकार भूषण पुरस्कारासाठी निवड केली. 

मुंबईतील मराठी ग्रंथसंग्रहालय येथील सुरेंद्र सभागृहात आयोजित केलेल्या एका छोटेखानी पण दिमाखदार शोलेत दिलीप जाधव याना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याने आता आपली जबाबदारी वाढली असल्याचे जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

टिप्पण्या