मंडणगडमध्ये अवैध बॉक्साईटची वाहतूक ; मा.सभापती संतोष घोसाळकर व संजय राणे
महाड : प्रतिनिधी (अक्षय जाधव)
प्रशासकीय अधिकारी गाफील??
महाड राजेवाडी ते मंडणगड आंबडवे देव्हारे चिंचघरे मार्गावर आशापुरा मायनिंग वर्क्स, दापोली या कंपनीच्या माध्यमातून बेकायदेशीर साठा करून ठेवलेल्या अवजड बॉक्साईटची अवजड वाहनांनी ओव्हरलोड मे. वेस्टर्न इंडिया डेव्हलपर्स मु. पो. ता. कणकवली यांच्यामार्फत तालुक्याचे मुख्य मार्गावरून अवैध वाहतूक होत आहे. या संदर्भात १५, १८ नोव्हेंबर २०२२, ७ व ८ डिसेंबर २०२२ अशी चार वेळा तक्रार देवूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने माजी सभापती संतोष घोसाळकर व संजय राणे यांनी २६ जानेवारी २०२३ रोजी मंडणगड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा