हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त दिव्यात बहुरंगी नमन

दिवा : प्रतिनिधी  (निलेश घाग)

हिंदु ह्रदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्यावतीने दि.23 जानेवारी रोजी सायं.6.30 वाजता रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातील मामळे जाधववाडी येथील बहुरंगी नमनाचे आयोजन करण्यात आले आहे.या नमन प्रयोगाला दिव्यातील सर्व नागरिकांना लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

कोकणात नमन ही लोकप्रिय कला समजली जाते.येत्या 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जाणार आहे.यानिमीत्त दिव्यातील नागरिकांना मनोरंजनाचा आस्वाद घेता यावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर कार्यकारिणीच्यावतीने नमन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्हा येथील संमेश्वर तालुक्यातील मामळे जाधववाडी येथील खेळे सादर करणार आहेत.या नमनाचे मुख्य आकर्षण नटखट गौळण –फाकळ्याची तांबु गाय असून गण-अग्निसुराचा वध तर वघनाट्य सैतानी डाव असा असणार आहे.

सदरचा नमन प्रयोग दिवा शहरातील एस.एम.जी.शाळेचे मैदान,दिवा आगासन रोड,दिवा स्टेशन(पुर्व) येथे सादर होणार आहे.या प्रयोगाला दिवेकर नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना दिवा उपशहरप्रमुख श्री सचिन राम पाटील,शिवसैनिक श्री नवनीत पाटील,मा.नगरसेविका सौ.अंकिता पाटील,दातिवली विभागप्रमुख श्री गुरुनाथ नाईक,युवा सेनेचे श्री अभिषेक ठाकूर,श्री वैष्णव पाटील यांनी केले आहे.

टिप्पण्या