गावमळा येतील डबर मध्ये मोठा गोलमाल....

महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष,निरपेक्ष चौकशी होण्याची मागणी 

संगमेश्वर : प्रतिनिधी

मुंबई गोवा राष्टीय महामार्गावर असणाऱ्या गावमळा गावातून जाणाऱ्या हायवे शेजारी असणारा डबर लॉकडाउन चा फायदा घेऊन बिन्दास्त घेऊन जात असल्याचे निदर्शनास येत आहे. लाखो रुपयांचा महसूल चुकवून हा डबर कुठे घेऊन जात आहे याची महसूल प्रशासनानी चौकशी  करावी अशी स्थानिक जनतेतून मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबई गोवा राष्टीय महामार्ग वरील आरवली ते कांटे या मार्गांवरील काम हे गेली काही वर्षे एम इ पी कंपनी करत होती त्या वेळी गावमळा येतील स्थानिक ग्रामस्थांची जागा भाड्याने घेऊन तेथे हा डबर ठेवला गेला होता. पण सद्या या भागाचे काम दुसरी कंपनी करीत आहे, टाळेबंदीचा (लॉक डाऊनचा) काळ उलटून तीन वर्षे झाली असताना ताळेबंदीच्या नावाव महसुसूल विभाग तसेच तेथील पुढारांच्या आशीर्वादाने डबर तीतून उचलला जातोय? अश्यामुळे कोकणच्या सौंदर्याची हानी होत नाही? मुळात एवढ्या मोठ्या  प्रमाणात डबर ची रॉयल्टी किती व ती भरली गेली आहे का?  असा प्रश्न विचारला जात आहे. या विषयात कोणाच्या वरदहस्ताने काम होतंय व महसूल प्रशासन गप्प का?  असा सवाल सर्व सामान्य जनता विचारू लागली आहे 

 तरी महसूल प्रशासनाने या लाखोंच्या डबर गोलमलाची सखोल चौकशी करावी ही मागणी सर्व सामान्य नागरिक करत आहेत

टिप्पण्या