महाराष्ट्र संरक्षण संघटन, संलग्न मी मराठी एकीकरण समितीचा ३रा वर्धापन दिन दादर येथे संपन्न !!




मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)

मराठी भाषा जतन, संवर्धन, संरक्षण आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी काम करणाऱ्या बिगर राजकीय चळवळ असलेल्या महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा आज रविवार दि.१५ जानेवारी २०२३ रोजी तिसरा वर्धापन दिन मेळावा तिरूपती ट्रेनिंग सेंटर, पहिला मजला, झारापकरच्या बाजूला, सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता.मेळाव्याचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने मराठी मावळे श्री. अक्षय पडवळ यांनी मुंबई ते गोवा हे अंतर ५६८ किलोमीटर धावून ४० तास १४ मिनिटात पूर्ण केले त्या बद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांचं नाव नोंदवले गेले.

त्याचबरोबर  श्री.‌सागर खोपडे, मुंबई अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी यांनी मुंबईतील कोविड कालावधीमध्ये दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी कस्तुरबा रुग्णालय मुंबई येथे एलपीजी गॅस बुलेट टॅंक लिकेज वर्दीवर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व कस्तुरबा रुग्णालयातील जीवितांचे तसेच मालमत्तेचे रक्षण केल्याबद्दल त्यांना दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी माननीय राष्ट्रपती यांचे अग्निशमन शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. अशा ह्या आपल्या मराठी शूरवीरांना महाराष्ट्र राज्याचे व मराठीचे नावलौकिक केल्याबद्दल आपल्या महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या माध्यमातून वर्धापन दिन मेळाव्याच्या निमित्ताने त्यांना आमंत्रित करून त्यांचा विशेष सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तसेच महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या ह्या चळवळीत यापुढे आता मराठी महिला सुद्धा सरसावल्या असून संघटनेच्या माध्यमातून महिला आघाडीची धूरा श्रीमती दीप्तीताई वालावलकर_(महिला अध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेश) आणि श्रीमती प्रगतीताई भोसले (महिला उपाध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश) म्हणून सांभाळणार असून तशी त्यांना संघटनेच्या वतीने नियुक्ती पत्र देऊन त्यांचा गौरव करून निवड करण्यात आलेली आहे.

आज आपल्या ह्या संघटनेच्या वर्धापन दिना निमित्त सर्व मराठी कार्यशील कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी मान्यवर उपस्थित होते. 

त्या सर्वाचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद तसेच आभार! मराठी पाऊल पडते पुढे...

एक व्हा एकत्रित या संघर्ष करा !

टिप्पण्या