रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ४ कोकणनगर मधील शिवसैनिकांचा मनसेत पक्षप्रवेश

रत्नागिरी : प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष  श्री.राजसाहेब ठाकरेंच्या तेजस्वी विचाराने प्रेरित होवून, युवा नेते मा.अमितसाहेब ठाकरे, जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. सतीशजी नारकर, दक्षिण रत्नागिरी  जिल्हाध्यक्ष श्री. अविनाशजी सौंदळकर यांच्या मार्गदर्शनात व रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ४ कोकणनगर येथील श्री. रूपेश चव्हाण,  श्री. अबरार काझी, श्री. अझीम शेख, श्री. पंकज सुर्वे,  श्री. प्रमोद क्षीरसागर,  श्री. दिपक साळवी, श्री. दीपक लिंगायत या शिवसैनिकांनी मनसेचा भगवा झेंडा हाती घेतला.

या पक्ष प्रवेशाप्रसंगी  रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेश जाधव, विभाग अध्यक्ष श्री. अखिल शाहू,  विभागअध्यक्ष श्री. जयेश फणसेकर,  श्री. सोम पिलणकर, तालुका संघटक श्री. जयेश दुधरे , उपसंघटक श्री. संदीप सुर्वे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या