मुंबई-गोवा महामार्गावर आरामबस उलटली; चार जणांचा मृत्यू, 23 जण जखमी
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महार्गावर कणकवली येथे आरामबस उलटून भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली येथे वागदे पुलानजीक खाजगी बसला भीषण अपघात झाला आहे. पहाटे 4 वाजता हा अपघात झाला असून या अपघातात 4 ठार तर 23 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.
गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. बस मुंबई ते गोवाच्या दिशेने जात होती. या बस 36 प्रवासी होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रायगडजवळ भीषण अपघतात ९ जणांचा मृत्यू
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. इको कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली आहे.
इको कार आणि ट्रक यांची समोरसमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. कार आणि ट्रकमधील टक्कर एवढी जोरदार होती की इको कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा