दिवा डंपिंग ग्राऊंड 31 जानेवारीपर्यंत पुर्णता बंद होणार ;दिवा महोत्सवात ठाण्याचे माजी महापौर श्री नरेश म्हस्के यांनी दिली ग्वाही

ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)

दिव्यात डंपिंगमुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.संपुर्ण धुर नागरी वस्तीत पसरत आहे.त्यामुळे या नवीन वर्षात 31 जानेवारी 2023 पर्यंत दिवा डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणारा कचरा पुर्णता बंद करणार असल्याची ग्वाही ठाण्याचे माजी महापौर आणि आत्ताचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते श्री नरेश म्हस्के यांनी दिली.श्री नरेश म्हस्के यांनी दिवा डंपिंग बंद करण्याबाबत दिवेकर नागरीकांना दिलासादायक वक्तव्य केले आहेत.
गेल्या अनेक वर्षे दिव्यातील डंपिंग ग्राऊंड विविध कारणांसाठी चर्चेत आहे.दिव्यात डंपिंगवरुन राजकीय आरोप आणि प्रत्यारोप नियमीत होत असतात.ठाणे महानगरपालिका दिव्यातील डंपिंग बंद करत नसल्याच्या कारणास्तव दिवा भाजपा तर्फे जेलभरो आंदोलन केले होते.यासाठी ते नागरीकांसह रस्त्यावर उतरले होते.त्यामुळे आज दिवा महोत्सवानिमीत्त आलेल्या ठाण्याच्या माजी महापौरांनी दिव्यातील नागरीकांना हा प्रश्न कायस्वरुपी सोडविण्यासाठी येत्या 31 जानेवारी 2023 पर्यंत अखेरची तारिख दिली आहे.या तारखेनंतर दिव्यातील डंपिंग टाकण्यात येणार नाही.किंवा ते पुर्णता बंद करणार असल्याचे जनसमुदारासमोर सांगितले आहे.यामुळे येथील नागरिकांसाठी हे वक्तव्य दिलासादायक आहे.

दिवा डंपिंगमुळे येथील नागरिकांच्या जनजीवनावर विपरित परिणाम करीत आहे.येथील कचऱ्याला समाजकंटक वारंवार आग लावून इतरत्र धुर पसरवित असतात.हे धुर शहरात मुख्यवस्तीत आल्याने नागरिकांना श्वास घेण्यासही परिमाणकारक ठरत आहे.दिव्यात आधीच सरकारी मेडिकल सुविधा नसल्याने तेथील नागरिकांच्या अडचणीत भरच टाकणारे आहे.मोकळा श्वास मिळावा ही सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.आता ही दखल ठाण्याच्या माजी महापौरांनी घेतल्याने नागरिकांचा कोंडलेला श्वास मोकळा होण्याचे संकेत आहेत.
काल चौदावा दिवा महोत्सवाची विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सांगता झाली.यावेळी खासदार श्रीकांत शिंदे,ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के,माजी उपमहापौर रमाकांत मढवी,यांच्यासह दिव्यातील सर्व माजी नगरसेविक व नगरसेविका,बाळासाहेबांच्या शिवेसनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या