चिपळूण शहरातील मुरादपूर भोईवाडा परिसरातील सांडपाणी स्थानिक नागरिकांच्या शेतंजमिनीमध्ये सोडल्यास आंदोलनाचा इशारा ; शुभम कदम

 

चिपळूण : प्रतिनिधी

चिपळूण शहरातील मुरादपुर भागांतील प्रमूख काही ठिकाणी गटाराच्या विकास कामासंदर्भात प्रशासनाने दुर्लक्ष केले गेल्यामुळे या भागांतील गटारातील सांडपाणी हे प्रामुख्याने रस्तावर अथवा स्थानिक नागरिकांच्या शेतंजमिनीमध्ये साचले जात असून तेथील भागातील स्थानिक नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. सदरहू भागांतील  स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार देउनही या गटाराच्या कामासंदर्भात कोणत्याही प्रकारे कारवाई न केल्यामुळे स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याविषयी चिपळूण नगर पालिकेचे मुख्यअधिकारी श्री. शिंगटे साहेब यांच्याशी चर्चा करून मुरादपुर भागातील स्थानिक नागरीकांना होणाऱ्या गैरसोयीची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी याची लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी श्री.शुभम कदम,श्री.निहार कोवळे, श्री. सचिन शेट्ये,श्री.ओंकार नलावडे,श्री.प्रसाद पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या भागांतील होणाऱ्या रस्ते व गटाराच्या विकास कामासंदर्भात चर्चा केली.

टिप्पण्या