१६ ते २१ जानेवारी दरम्यान रंगणार 'रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी'चा थरार
शहरातील ओम साई स्पोर्टस् क्लब आणि संगमेश्वर-रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदयजी सामंत व त्यांचे ज्येष्ठ बंधू तथा रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक मा. किरणशेठ सामंत यांच्या पुढाकारातून रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दि. १६ ते २१ जानेवारी २०२३ मध्ये 'रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सुपर लीग या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा दिवस-रात्र स्वरुपात खेळवली जाणार असून दुपारी ३:३० ते रात्रौ १०:०० वाजेपर्यंत सामने खेळविण्यात येतील. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला रूपये ५,५५,५५५रोख रक्कम व करंडक प्रदान केला जाणार आहे. तर उपविजेत्या संघाला रूपये ३,३३,३३३ रोख रक्कम व पारितोषिक मिळणार आहे. याशिवाय सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी अनेक पारितोषिके यावेळी वितरीत केली जाणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुणवंत क्रिकेट खेळाडूंचा शोध घेऊन पुढील काळात त्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आवश्यक सहकार्य करणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीतजास्त संघांनी या स्पर्धेसाठी नामनिर्देशन करून सहभागी व्हावे असे आवाहन ओम साई स्पोर्टस् क्लब रत्नागिरी यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा