रत्नागिरी पोलिसांची कारवाई , गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरी शहराजवळच्या मिरजोळे पाटीलवाडी येथे गावठी दारू निर्मितीच्या हातभट्टीवर शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत ३ लाख २३ हजार रुपयांचा गावठी दारू साठा आणि दारू निर्मितीचे साहित्य नष्ट केले. या प्रकरणात शिवजीत सुनिल पाटील (रा. मिरजोळे पाटीलवाडी, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले. शुक्रवारी  पोलिसांनी ही कारवाई केली.

          मिरजोळे येथे गावठी दारुची हातभट्टी सुरु असल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये दारु निर्मितीकरीता लागणारे साहित्य, ४० लिटर गावठी दारु, २०० लिटर क्षमतेचे ६० बॅरल, १२ हजार लिटर रसायन असे सुमारे ३ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जाळून नष्ट करण्यात आला. ही कारवाई शहर पोलिस ठाणे पथक, स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि क्यू.आर.टी पथकाने केली.

टिप्पण्या