शिवसेनेच्या उपनेत्या आशा विचारे मामेटी यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई येथील गिरगाव विभागातील शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबई टॅक्सी चालक मालक संघटनेच्या उपाध्यक्ष आशा विचारे मामेटी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करित भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार अर्जुन खोतकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, आशा वढावकर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा