शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे टिटवाळ्यातील अनाथ मुलांना दिवाळी फराळ व अन्नधान्य वाटप

ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)

शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने टिटवाळा येथील अंकुर सामाजिक संस्था, अंतर्गत अंकुर बाळ विकास केंद्र या अनाथालयातील मुलांना दिवाळीनिमित्त फराळ व अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष सत्यवान जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य सचिव दयानंद महाकाळ, महिला प्रदेशाध्यक्ष श्रेयश्री ताई गोडांबे, कल्याण डोंबिवली अध्यक्ष मंगेश वाघोले, टिटवाळा शहर अध्यक्ष अनिल भाऊ जाधव, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत ढूबे , टिटवाळा शहर संघटक जय जाधव, सदस्य संतोष खैरे, चेतन गुरव, विनोद वाणी, संतोष कदम, जनार्दन जाधव, धनंजय पागार, मिलिंद रोठे, गणेश पाल,रवि महाडे आदींनी ही कार्यात विशेष परिश्रम घेतले.

शिवशंभु प्रतिष्ठान ही महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धन, जतन, स्वच्छता मोहिमेसाठी सक्रीय असलेली संस्था असून ठाणे, रायगड आणि पालघरातील अनेक किल्ल्यांवर स्वच्छता अभियान या संस्थेने राबविले आहेत. तसेच आपल्या राज्यातील आदिवासी दुर्गम भागात असलेली कुपोषित बालके, गरीब-दीन बालकांच्या विकासासाठी कार्यरत आहे. गेली दोन वर्षे दिवाळीनिमित्त मुरबाड, शहापूर, सुधागड, भिवंडी, टिटवाळा, रत्नागिरी, आदी भागातील अनाथ मुलांना दिवाळी फराळ, अन्नधान्य, कपडे वाटप संस्था करीत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत संस्थेचे सामाजिक कार्य जोमात सुरू आहे. संस्थेच्या या कार्यात राज्यभरातील शेकडो तरुणांचा हातभार लाभत आहे. शिवशंभु प्रतिष्ठान ही संस्था राज्यभर सक्रीय राहून अनाथ, दीन दुबळयांच्या सेवेसाठी झटत आहे. विविध क्षेेत्रात, उद्योग-धंद्यात कार्यरत असलेल्या मराठी तरुणांनी संस्थेत सहभागी होवून संस्थेच्या उपक्रमांस सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सत्यवान जाधव यांनी केले आहे.

टिप्पण्या