रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत ॲक्शन मोडमध्ये प्रत्येक दौरा घेणार काही शासकीय कार्यालयांची झडाझडती


 रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी दौरा वरती आले असताना त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीतील जनतेच्या काही समस्या सांगितल्या. शासकीय कार्यालयांमध्ये जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांची होणारी शौचालयाची गैरसोय,बस्थानक येथिल शौचालय तसेच जिल्हा रुग्णालयातील विविध भागाची अचानक पाहळणी करून अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आहे.ना. उदय सामंत यांच्या आजच्या या अचानक झालेल्या भेटीने अधिकारी वर्गाची झोप उडाली आहे.

रत्नागिरी येथिल जिल्हाधिकारी येथे असणाऱ्या शौचालयाचे तीन तेरा वाजले असताना सुसज्ज असणाऱ्या इमारतीचा वापर लोकांना होत नव्हता. त्यामध्ये घाणींची साम्राज्य पसरले होते. त्याची प्रत्यक्षात जाऊन पहालणी करून त्या ठिकाणी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. त्यानंतर राहटाघर येथिल  बसस्थानकात उदय सामंत यांनी भेट दिली त्या ठिकाणी असणाऱ्या प्रवाशांच्या  शौचालयाची तसेच कर्मचाऱ्यांच्या शौचालयाची पाहणी केली त्या ठिकाणी शौचालयाची परिस्थिती पाहून ना. उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आणि सदरील बस स्थानक हे जिल्ह्याचे बस स्थानक असून या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून लोक ये-जा करत असतात आणि अशा बस्थानकाची  दुरवस्था होणे हे रत्नागिरी जिल्ह्यासाठी लाजिरवाणी असल्याची बाब ना.उदय सामंत यांनी अधिकाऱ्याने सुनावले आहे. त्यामुळे आठ दिवसात या बसस्थानकाची तसेच शौचालयाची झालेली व्यवस्था तत्काळ सुधारावी असे आदेश ना.उदय सामंत यांनी दिले आहेत. यापुढे होणाऱ्या प्रत्येक दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील अनेक कार्यालयांना अचानक भेटी देऊन तेथील कारभार जाणून घेणार असल्याचे उदय सामंत  सांगायला विसरले नाही. पालकमंत्र्यांनी आजच्या घेतलेल्या निर्णयामुळे रत्नागिरीचे पालकमंत्री नक्कीच ॲक्शन म्हणून मध्ये आल्याचे दिसून आले आहे.

टिप्पण्या