“ओ भास्करशेठ माझ्या नादी लागू नका, तुम्ही नाच्याचं…”, भास्कर जाधवांनी नक्कल केल्याने चित्रा वाघ संतापल्या

 



मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)

“ओ भास्करशेठ माझ्या नादी लागू नका, तुम्ही नाच्याचं…”, भास्कर जाधवांनी नक्कल केल्याने चित्रा वाघ संतापल्या

तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नव्हे तर आम्ही आमच्या जीवावर लढतो, चित्रा वाघ यांनी सुनावलं

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सभेमध्ये आपली नक्कल केल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांना विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील पूजा चव्हाण प्रकरणावरुन टोला लगावला आहे. कुडाळ येते कार्यकर्त्यांसमोर भाषण करतान त्यांनी चित्रा वाघ यांची नक्कल केली. यानंतर चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीट केला असून माझ्या नादी लागू नका सांगत जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाल्या आहेत चित्रा वाघ?

“ओ, भास्करशेठ तुम्ही आधी आणि आताही नाच्या’चं चांगल काम करता, तेच करा. माझ्या नादी लागू नका. जेव्हा पूजा चव्हाणसाठी मी लढत होती तेव्हा बिळात घुसला होतात की तोंडाला लकवा मारला होता? तुमच्यासारखे सुपारीबाज आणि भाडोत्रींच्या नव्हे तर आम्ही आमच्या जीवावर लढतो..याद राखा,” अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी भास्कर जाधव यांना सुनावलं आहे.

टिप्पण्या