ग्रामपंचायत निवडणूक! मनसेला उभारी, भिवंडीत उघडलं खातं


ठाणे : प्रतिनिधी

राज्यात महाविकास आघाडी सरकार जात शिंदे-भाजपाचे सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत आहे. या निवडणुकीचा निकाल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत भाजपाने आघाडी घेतल्याचं दिसत आहे. महाविकास आघाडीने सुद्धा चांगली सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. तर, मनसेनेही आपलं पहिलं खाते उघडले आहे.

रविवारी ( १६ ऑक्टोंबर ) रविवारी राज्यात ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली होती. त्यानुसार १८ जिल्ह्यांतील ८१ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी ८२ टक्के मतदान झालं होते. त्याची मतमोजणी सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली आहे.

त्यात आता भिवंडी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे खाते उघडलं आहे. भिवंडीतील शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेने विजय मिळवला आहे. येथे नऊ पैकी सहा जागेवर मनसेने आपला झेंडा रोवला आहे. तर, सरपंचही मनसेचा निवडून आला आहे.

टिप्पण्या