नागपूर-मडगाव-नागपूर ही विशेष साप्ताहिक गाडीस संगमेश्वर रोड थांबा मिळविण्यास यश - संदेश जिमन

संगमेश्वर : प्रतिनिधी (योगेश)

नागपूर-मडगाव-नागपूर ही विशेष साप्ताहिक गाडी गणपती उत्सवाच्या काळात सुरू झाली त्यावेळी संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन थांबा होता. गणपती नंतर ही गाडी कायमची करणार अशी चर्चा सुरू झाल्यानंतर संगमेश्वर रोड स्थानकाचा थांबा रद्द करण्यात आला. संपूर्ण संगमेश्वर तालुक्यावर अन्याय करण्यात आला. ह्या अन्यायाला वाचा फोडण्याची लढाई सुरू करण्यात आली ती ‘निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर’ या फेसबुक ग्रुपचे  पत्रकार संदेश जिमन आणि त्यांचे सहकारी  ह्यांनी ह्या अन्यायाची दखल घेत कोकण रेल्वेच्या विविध विभागांशी पत्र व्यवहार करून हा प्रश्न उच्च स्तरावर मांडला. कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात सीएमडी संजय गुप्ता यांना त्या संदर्भातील पत्रही दिले, तसेच विभागीय आमदार श्री. शेखरजी निकम यांच्याशी ही यासंदर्भात चर्चा केली.

ह्या सर्व प्रयत्नांना यश येऊन कोकण रेल्वेने नवीन आध्यादेश  काढले. त्यानुसार नोव्हेंबरपासून नागपूर-मडगाव-नागपूर ह्या द्वि-साप्ताहिक गाडीला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर थांबा बहाल करण्यात आला आहे.  तरी सर्व संगमेश्वरवासीय प्रवाशांनी या साप्ताहिक गाडीचे जास्तीत जास्त आरक्षण करून त्याचा लाभ घ्यावा. जेणे करून मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन थांबा कायमस्वरुपी ठेवता येईल.

ह्या आनंदाची बातमीने संगमेश्वरच्या विविध स्तरांतून  ‘निसर्गरम्य चिपळूण-निसर्गरम्य संगमेश्वर’ या फेसबुक ग्रुपचे सर्व सदस्य आणि ग्रुप चे प्रमुख पत्रकार संदेश जिमन 

त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

टिप्पण्या