मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहदेव बेटकर यांचा पक्ष प्रवेश
मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहदेव बेटकर यांनी केला पक्ष प्रवेश
रत्नागिरी : प्रतिनिधी (योगेश मुळे)
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सहदेव बेटकर यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत सहदेव बेटकर यांनी केला पक्ष प्रवेश राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहदेव बेटकर यांनी केला पक्ष प्रवेश, सहदेव बेटकर यांना लवकरच मिळणार मोठी जबाबदारी सहदेव बेटकर गुहागर विधानसभा निवडणूक लढले होते, त्यांच्या या पक्ष प्रवेशाने संगमेश्वर, चिपळूण, गुहागर तालुक्यांत राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण
सहदेव बेटकर हे रत्नागिरीतील कुणबी समाजाचे नेते असून रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा चांगला संपर्क आहे. याशिवाय सामाजिक कार्याच्या माध्यमातून चांगले काम आहे. त्यांच्या पाठीमागे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील लोक भक्कमपणे उभे आहेत.
गुहागर विधानसभा मतदारसंघात त्यांनी ऐनवेळी भास्कर जाधव यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली त्यांना केवळ साडेतीन हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.
यावेळीही मी गुहागर वासियांच्या संपर्कात असून मी माझी तयारी सुरू ठेवली आहे आणि यावेळेसही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत समोर असणाऱ्या उमेदवाराला धुळ चारणार असल्याचे सहदेव बेटकर सांगायला विसरले नाही. राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माझ्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहदेव बेटकर यांच्या समावेत शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती कृष्ण हरेकर, पप्पू सुर्वे, कमलाकर ब्रीद सहित हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर प्रवेश केला.ना.उदय सामंत यांच्या मार्गदर्शना खाली हा प्रवेश झाला असून प्रवेश करण्यासाठी अल्पसंख्यांकचे नेते रमजान गोलंदाज आणि जमूरत अलजी यांनी प्रयत्न केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा