मनसेच्या नेत्या रेश्मा तपासे यांच्याकडून परप्रांतीय विरोधात पोलीसाना निवेदन


भाईंदर : प्रतिनिधी

राजसाहेबांनी कायम एक महत्त्वाचा विषय लावून धरला तो म्हणजे या महाराष्ट्रात पर्यायाने मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरात बाहेरून जे येणारे लोंढे आहेत ते कोण आहेत, कुठून आलेत, कशासाठी आलेत, त्यांचे नाव, पोलीस रेकॉर्ड्स अशा असंख्य बाबी आपल्या कडे तपासल्या जात नाही. मागे अधिवेशन मध्ये साहेबांनी मिरा भाईंदरचा प्रामुख्याने उल्लेख केला होता.
 
मिरा भाईंदर शहरात भिकारी, गर्दुल्ले, ड्रग्ज डीलर मोठ्या प्रमाणावर आहेत ,याच पार्श्वभूमीवर मिरा रोड मध्ये टुकटुक फूड कॉर्नर पासून रामदेव पार्क परिसरात भिकार्‍यांची मागील दोन ते तीन महिन्यांपासून संख्या वाढत आहेत.  त्यासाठी आज मी कनकिया पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या कडे तक्रार दाखल केली त्यांचे लक्ष या गोष्टी कडे वेधले. त्यांनी लवकरात लवकर कारवाईचे आदेश दिले. बघूयात किती दिवसांत कारवाई होते ते. नाही झाले तर मनसे आहेच असे रेश्मा तपासे यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या