भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात भाजपा कार्यकर्त्यांचे आमदार प्रसाद लाड यांना निवेदन






 संगमेश्वर: प्रतिनिधी (योगेश )

संगमेश्वर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात एकूण १९ जागा असताना संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचा कारभार अवघ्या ४ कर्मचार्‍यांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचार्‍यांवर अतिरिक्त ताण येऊन जवळपास ७०% कामे प्रलंबित आहेत.

संगमेश्वर तालुक्याचा विस्तार पहाता आपल्या कामासंदर्भात सुदूर क्षेत्रातील नागरिक देवरुखमध्ये आल्यास त्यांचा संपूर्ण दिवस प्रवास आणि कार्यालयीन कामकाजात जातो. अशात वेळेत कामाचा निपटारा न झाल्यास त्यांना पुन्हा फेरी मारावी लागते. अशाने नागरिकांच्या पैशाचा व वेळेचा अपव्यय होत आहे. अशा स्वरूपाची कैफियत भाजपाचे संगमेश्वर तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे  यांनी विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्याकडे मांडली. सोबतच उर्वरित १५ पदांची भरती तात्काळ करावी असे निवेदन दिले. या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद देत आमदार लाड यांनी मा. महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांचेशी चर्चा करून लवकरात लवकर ही समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी डॉ. अमित ताठरे यांच्यासोबत भाजपा संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, उपाध्यक्ष मिथुन निकम तसेच विनोद म्हस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या