वालोपे ते कापसाळपर्यंतच्या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण करावे बाळासाहेबांची शिवसेना गटाची मागणी
चिपळूण (प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे ते कापसाळपर्यंतच्या सर्व्हिस रोडची दुरुस्ता झाली असून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी ठेकेदार कंपनीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना या गटाने ठेकेदार कंपनीकडे निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा नंतर कृतीतून उत्तर दिले जाईल, असा इशारा या गटाने दिला आहे.
सदरील निवेदन बाळासाहेबांची शिवसेना तालुका प्रमुख संदेश आयरे यांच्या नेत्तृत्वाखाली शिष्ट मंडळाने कंपनीला दिले आहे. यानुसार गेले काही महिने वालोपे ते पाग कापसाळपर्यंतच्या सर्व्हिस रोडची दुरस्ता झाली आहे. पावसाळ्यात चिखलातून वाहने चालवावी लागली. आता तर धुळीचा त्रास होत आहे. विशेषत: दुचाकीस्वाराने याचा मोठा त्रास होत आहे. या मार्गावर अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. यामुळे सर्व्हिस रोडची रस्त्याची डांबरीकरण येत्या आठ दिवसात करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख अनंत पवार, तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, विभाग प्रमुख अजय कदम, कापसाळ सरपंच सुनिल गोरिवले, युवा कार्यकर्ते निहार कोवळे, सचिन शेट्ये, राकेश देवळेकर, ओंकार नलावडे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा