माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मिऱ्या रेशन दूकानात आनंदाचा शिधाचे वाटप

 रत्नागिरी : प्रतिनिधी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी गोरगरीब जनतेची दिवाळी सुलभ व्हावी या हेतून अल्प किमतीत साखर , रवा , चणाडाळ , व तेल या गोष्टीचे पॅकेट बनवून , ' आनंदाचा शिधा ' म्हणून राज्याच्या गरीब जनतेला देण्याचा निर्णय केला..

 मिऱ्या विविध विकास सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हेमंत राव माने यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अथिती म्हणून  रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन माजी आमदार बाळासाहेब माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मिऱ्या रेशन दुकानात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला..बाळासाहेब माने यांच्या हस्ते पहिला लाभार्थी मिऱ्या आलावा येथील श्रीमती गुलाब शिवलकर यांना हा आनंदाचा शिधा देण्यात आला..

    यावेळी मिऱ्या विविध विकास सोसायटीचे संचालक दीपक पाटील, सुधीर जाधव, मनोज साळवी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या