मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या बद्दल शिवने येथील तरुणाला दिला मन सैनिकांनी प्रसाद

संगमेश्वर : प्रतिनिधी (योगेश मुळे )

 मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या बद्दल शिवने येथील एका तरुणाला  मनसैनिकांनी भर संगमेश्वर बाजारपेठेत प्रसाद दिला. 

सदरची व्यक्ती हा संगमेश्वर मधील शिवसैनिक असून त्याने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरेवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. आजच्या घटने नंतर त्याने कान पकडून माफी मागितली.

यावेळी  मनसे रत्नागिरी (मध्य) जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, ता.अध्यक्ष/नगरसेवक अनुराग कोचिरकर, देवरुख उपशहराध्यक्ष शेखर नलावडे, स्वयम रोजगार तालुका संघटक सनी प्रसादे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या