मुलं चोरीच्या अफवेमुळे दिव्यात तरुणाला नागरिकांची जबर मारहाण; पोलिसांनी अफवेला बळी न पडण्याचे केले आवाहन...

ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)

मुलं चोरी करीत असल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी एका पिंटू निसार नामक युवकास जबर मारहाण केली असून या अफवेमुळे संपुर्ण दिव्यात भितीचे वातावरण पसरले होते.मात्र दिवा पोलीसांनी सदर युवकाला ताब्यात घेतले असता तो युवक जय मल्हार येथील हाँटेल कामगार असल्याचे निदर्शनास आले आहे.दरम्यान पोलीसांनी नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता अनुचित प्रकार दिसल्यास तातडीने दिवा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.याबाबत युवकाला जबर मारहाण झाल्याने आता पोलीस मारहाण करणाऱ्या नागरिकांचा शोध घेवून गुन्हा दाखल करणार आहेत.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, आज दुपारी १ च्या सुमारास दिव्यातील सेंट मेरी स्कूल,मुंब्रा देवी काँलनी येथून दोन सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी परतत होत्या.याच दरम्यान जय मल्हार येथील पिंटू नामक युवक कोंबडीचे चिकण आणण्यासाठी जात होता. असे असताना रस्त्याने चालताना दोन छोट्या मुली ट्रकसमोर येत असल्याचे पाहून पिंटूने रस्ता क्राँस करण्यासाठी त्या छोट्या मुलींचा हात धरुण बाजूला करु लागला होता. हे पाहून येथील नागरिकांनी हा युवक या मुलींची चोरी करीत असल्याचे भासू लागले होते. म्हणून इतर नागरिकही जमा झाले, यातील काहींनी या युवकाची कोणतीही खात्रीजमा न करता चोर समजून जबर मारहाण करण्यास सुरवात केली.यामुळे या युवकाला जबर मुका मार लागला आहे.उपचारासाठी त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हाँस्पीटलला दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान नागरिकांनी कोणतीही शहनिशा न करता लोकांना मारहाण करु नये.अश्याने एखाद्याचा जीव जावू शकतो.लोकांवरही कारवाई होऊ शकते.अश्या प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांवर आम्ही तत्काळ कारवाई करीत आहोत. 

असे वरिष्ठ पोलीस निरिक्षक,मुंब्रा पोलिस ठाणे श्री अशोक कडलग यांनी सांगितले आहे

टिप्पण्या