नागपूर-मडगाव-नागपूर साप्ताहिक एक्स्प्रेसचा संगमेश्वर थांबा काढून घेतल्याने प्रवासी संतप्त
संगमेश्वर : प्रतिनिधी (गणेश पवार)
प्रत्येक सणासुदीच्या दिवसात नागपूर-मडगाव-नागपूर ही साप्ताहिक एक्स्प्रेस गाडी सुरू होती. त्याप्रमाणे या गणपती महोत्सवाच्या काळातसुद्धा ही गाडी सुरू केली गेली. त्यावेळी संमगेश्वर रोड स्थानकामध्ये सदर गाडीला थांबा होता. सदर गाडी गेली 2 वर्षांपासून सुरू आहे. आता त्या गाडीला ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी कायमस्वरूपी सुरू राहणार अशी बातमी पुढे आली आणि या गाडीचा संगमेश्वर रोड थांबा काढण्यात आला.
नेत्रावती-मत्स्यगंधा या एक्स्प्रेस गाड्यांसाठी सुरू असलेले आमचे आंदोलन संपूर्ण संगमेश्वर तालुक्याला माहीत आहे. एक वेळा आम्ही उपोषण केले. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आंदोलन नको असे मान्यवर मंडळींनी विनंती केली म्हणून आम्ही आंदोलन मागे घेतले. परंतु कोकण रेल्वेचा कोकणाबद्दल दुजाभाव चालू आहेच. तसेच सदर गाडीचा संगमेश्वर रोड स्थानकातील थांबा काढण्यामागचे कारण काय ते समजू शकले नाही. त्यामुळे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात नाराजी निर्माण झाली आहे आता आंदोलनासाठी जनमताचा रेटा वाढू लागला आहे. कोकण रेल्वेसोबत पत्रव्यवहार झाला आहे. आता आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तसेच मागणी मान्य झाली नाही, तर परत एकदा उपोषणासारखे आंदोलन करावे लागेल व होणार्या परिणामाला कोकण रेल्वेच जबाबदार असेल असे ग्रुपचे प्रमुख व पत्रकार संदेश जिमन यांनी कळविले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा