रत्नागिरी तालुका काँग्रेसच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढवण्याचा विचार सुरू

रत्नागिरी : प्रतिनिधी (योगेश मुळे)

रत्नागिरी तालुक्यातील होणाऱ्या आगामी जिल्हापरिषद ,ग्रामपंचायत निवडणुका धर्तीवर विचार विनिमय करणेसाठी रत्नागिरी तालुका काँग्रेसची महत्वाची बैठक काँग्रेस भवन कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालीसदर बैठकीत सर्वानुमते स्वबळावर पुढील निवडणुका लढवूया अशी मागणी तालुकाध्यक्ष विकास पाटील यांच्याकडे करण्यात आली. उमेदवार निवडण्यासाठी प्रत्येक विभागात प्रत्यक्षात जाऊन भेटी घ्याव्यात असा ठराव करण्यात आला. सदर बैठकीत तालुकाध्यक्ष विकास पाटील,सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष अशोक जाधव,ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दिपक राऊत, माजी उपनगराध्यक्ष बाळाशेट मयेकर,महिला जिल्हाध्यक्षा ॲड अश्विनी आगाशे,मिडिया विभाग जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर,अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष हरीश शेकासन, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत,मिडिया प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे,जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी, जिल्हा सरचिटणीस शब्बीर भाटकर,जिल्हा सरचिटणीस कॅप्टन हनीफ खलीपे, महिला तालुकाध्यक्ष रिझवाना शेख,शहर अध्यक्ष साईराज चव्हाण, रवींद्र खेडेकर,युवकचे शहर अध्यक्ष चेतन नवरांगे,कल्पेश जाधव, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या