पिंपरी खुर्द येथील माजी शाखाप्रमुख संजय जांबूर्गे यांच्यासह शिवसैनिकांचा आमदार शेखरजी निकम यांच्या उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश
चिपळूण : प्रतिनिधी (दिगंबर घाग)
आमदार शेखरजी निकम मागील तीन वर्षाततील चिपळूण संगमेश्वर मतदार संघातील विकास कामांचा ओघ पाहता असंख्य शिवसैनिकांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. संजय जांबूर्गे म्हणाले की आम्ही शिवसैनिक होतो परंतु आमदार साहेबांच्या विकास कामाचा वेग पाहिलं असता आमच्या मध्ये विकास कामाची ज्योत निर्माण झाली त्याचमुळे आम्ही आमच्या स्व:इच्छेने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करीत आहोत.
यावेळी विकास जांबूर्गे, समीर बेचावडे, संकेत जांबूर्गे, अरविंद रेमजे, पंकज सागवेकर,किशोर थोरे,संतोष जांबूर्गे, शैलेश चव्हाण, सुरेश कोठारे,सनी कदम,देवेंद्र गुरव, संदीप आग्रे, यांनी आमदार शेखरजी निकम यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा