संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्षपदी सुयोग कदम यांची नियुक्ती


चिपळूण : प्रतिनिधी (दिगंबर घाग)

संत गाडगेबाबा परिट समाज संस्था रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्षपदी सुयोग सुभाष कदम तर सचिवपदी रुपेश राजाराम चाळके यांची निवड करण्यात आली आहे . संस्थेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली .

नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्ष सुयोग कदम , उपाध्यक्ष संदेश चव्हाण , ज्ञानेश भोसले , सचिवपदी रुपेश चाळके , सह सचिव संकेत सु.कदम ,खजिनदार प्रथमेश कदम , सहखजिनदार निरज दुर्गावले , संघटक रितेश कदम , सदस्यपदी तेजस कदम , शुभम कदम , निलेश कदम , ओंकार दुर्गावले , आकाश पिंपळकर , ऋतुराज कदम, अजिंक्य रोकडे , अरुण कडा, मकरंद उचाटकर यांची निवड करण्यात आली .

नवीन युवा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम , महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष कदम ,राज्य सल्लागार हसमुखभाई पांगारकर , उपाध्यक्ष वसंत पिंपळकर , जगदीश कदम जिल्हा सचिव स्वप्निल शिंदे व सहसचिव रितेश महाडिक , खजिनदार राजू भोसले , सहखजिनदार दर्गेश्वर रोकडे , लॉन्ड्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण शिंदे , महिला जिल्हाध्यक्षा प्रिया शिंदे , सल्लागार आबा महाडिक , संतोष कदम , दशरथ पावसकर, वैशाली शिंदे, सुयोग घाग, संतोष शिंदे, शैलेश दुर्गावले, अरुण नाकती, विजयराव कदम, सुरेश कदम आदींनी अभिनंदन केले.



टिप्पण्या