मुंबईतील सिद्धकला तायक्वांडो अकॅडमीच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी


११ सुवर्ण , १८ रौप्य व १८ कांस्य पदक पटकावली

घाटकोपर (शांत्ताराम गुडेकर) ईड कप ऑनलाईन खुली राष्ट्रीय तायक्वांडो पुमसे स्पर्धेत मुंबईतील सिद्धकला तायक्वांडो अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ११ सुवर्ण , १८ रौप्य व १८ कांस्य पदक पटकावले. २५ जून ते २७ जून २०२१ दरम्यान वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा भरवण्यात आली होती. कोरोनाच्या काळात गतवर्षी सर्व स्पर्धा बंद होत्या. २०२१ मध्ये पार पडणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धासाठी सिद्धकला अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक जयेश वेल्हाळ , सप्रशिक्षक निशांत शिंदे , प्रशिक्षक विनीत सावंत , विक्रांत देसाई , यश दळवी , कृपेश रणक्षेत्रे , चंदन परिडा , फ्रँक कनाडीया , स्वप्नील शिंदे यांनी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यरत ठेवून त्यामार्फत खेळाडूंच्या प्रतिकारशक्ती व तंदुरुस्ती वर लक्ष  केंद्रित करून घेतले. २०२१ प्राईड कप ऑनलाईन खुली राष्ट्रीय तायक्वांडो पुमसे स्पर्धेत बेल्ट कॅटगरीत अंगद नाडकर्णी , रिदिमा भगतानी , आयुश रौटेला , दिवीश भगतानी , अवनी चव्हाण , विहान जैन , शनाया , जयविर कोचर , आर्या पाटकर , अनाया बत्रा या ११ जणांनी सुवर्ण तर आरव चव्हाण , तनिष्का वेल्हाळ , जीआना पडियार , अमायरा पेंटर , प्रतीती देसाई , जय संगांनी , आर्यवीर अग्रवाल , दियान मेहता , विवान मेहता , अहान जैन , वेदांश अग्रवाल , हिर ठक्कर , फिसा इनामदार , आनया चौकानी , समारा अग्रवाल प्रमेय गणतरा , सोहम आचरेकर या १८ जणांनी रौप्य आणि अर्णव अत्रे , निमांश चांदोक , रिहान पटेल , मीरा मेनन , नंदिनी वेद , त्विशा सिंन्हा, समर्थ चांदोक , मिशा अरोरा , मायशा जैन , अस्मि ठाकूर , शिवम चौरसिया , धात्री ताम्हाणे , शिवाली चौरसिया , निळोदय राज , आदी १८ जणांनी कांस्य पदक पटकावत राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेचे आयोजक आंतराष्ट्रीय पंच अमित अग्रवाल यांनी मुख्य प्रशिक्षक जयेश वेल्हाळ व त्यांच्या टीमचे खेळीसाठी दिलेल्या प्राधान्य व योगदानाचे अभिनंदन केले.

टिप्पण्या