दिवा परिसरात सुरू असलेली कामे जलदगतीने पूर्ण कराण्यासाठी दिवा विभागातील कामांचा खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतला आढावा
ठाणे (प्रतिनिधी) : दिवा विभागात सुरू
असलेल्या विविध कामांबाबत आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी महापौर नरेश म्हस्के
यांच्या उपस्थितीत महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला व
त्यानंतर महापालिका पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक
यांच्यासमवेत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत
दिवा विभागात सुरू असलेली कामे ही जलदगतीने पूर्ण करण्यात यावी व दर पंधरा
दिवसांनी आढावा घेण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.
ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्केमाजी उपमहापौर रमाकांत मढवी, स्थानिक नगरसेवक शैलेश पाटील, दिपक जाधव, नगरसेविका दर्शना म्हात्रे, अंकिता पाटील, प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, नगरअभियंता रविंद्र खडताळे, सहाय्यक संचालक नगररचनाकार सतीश उगिले, शहर विकास व नियोजन अधिकारी शैलेश बेंदाळे, अतिरिक्त नगरअभियंता अर्जुन अहिरे, दिवा प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर व सर्व विविध विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
या बैठकीमध्ये दिवा विभागातील विविध कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी दिवा-शिळ रोड, दिवा-आगासन रोड, दिवा बायपास, दातिवली उसरघर रस्ता, साबे रोड, रेल्वे ओव्हर ब्रीज आदी रस्त्यांची कामे जलदगतीने व्हावीत या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी असे निर्देश बैठकीदरम्यान देण्यात आले. तसेच दिवा विभागातील खिडकाळी प्राचीन मंदिर परिसरातील सुशोभिकरणासाठी डीपीआर तयार करणे, नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचे काम करणे, सुविधा भूखंडावर आगरी कोळी भवन सभागृह उभारणे, मेट्रो जोड रस्त्याची कामे प्रस्तावित करणे, विविध ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेल्या पाईपलाईनचे काम करणे, दिवा-मुंब्रा रस्त्याचा डी.पी. आर तयार करणे, बांधून तयार असलेले जलकुंभ कार्यान्वित करणे तसेच अस्तित्वातील डंपिंग ग्राऊंडला पर्यायी जागा शोधून याबाबत तातडीने निर्णय घेणे आदी कामांबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले.
दिवा विभागाच्या सर्वांगीण विकासाबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली व सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी दर पंधरा दिवसांनी बैठक घेण्याच्या सूचनाही आयुक्तांनी यावेळी दिल्या.
महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित
अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांनी सर्वांचे आभार
व्यक्त केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा