संजय गोंधळी यांना पित्रुशोक
कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका संगमेश्वर चे अध्यक्ष आणि संगमेश्वर तालुका कुणबी सह पतपेढी चे संचालक श्री संजय शांताराम गोंधळी यांचे वडील श्री शांताराम बाबू गोंधळी वय वर्षे ७४ मुक्काम हातिव यांचे शुक्रवार दिनांक २ जुलै रोजी रात्री ९ वा अल्पशा आजाराने निधन झाले
शांताराम गोंधळी हे कष्टाळू परोपकारी, समाजसेवी आणि एक जिद्दी म्हणावे लागेल.
व्यवसायिक होते गेली अनेक वर्षे ते देवरूख शहरात कापड दुकान चालवत होते ऊन, पाऊस, सणवार काहीही असो शांताराम गोंधळी मात्र प्रत्येक दिवशी सकाळी ८.३० वा दुकानात हजर असायचे दिवसभर दुकानात काम करायचे याशिवाय गावातील गरजुना नोकरी धंद्यासाठी मार्गदर्शन करायचे समाजघटकांना गरजेला आर्थिक मदतही करायचे श्री शांताराम बाबू गोंधळी हे हातिव गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तीमत्व आणि धडाडीचे कार्यकर्ते नेते होते आणि मुख्य म्हणजे वयाच्या शेवटपर्यंत कार्यरत होते.
देवरूखला गेल्या वर कधी कधी त्यांच्या दुकानात जायचो तेव्हा ते सर्वांची आपुलकीने चौकशी करायचे. स्वयंरोजगार सामाजिक अडचणी याबद्दल ते भरभरून बोलायचे. शांताराम गोंधळी यांच्या निधनामुळे श्री संजय गोंधळी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या दुःखातून उतराई होण्याचे बळ गोंधळी कुटुंबीयांना मिळो आणि श्री शांताराम गोंधळी यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो
हिच ईश्वरचरणी प्रार्थना
श्री. शांताराम बाबू गोंधळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा