समाजसेवक तथा मुंबई उच्च न्यायालय कर्मचारी श्री. चंद्रकांत करंबेळे यांनी आणि मुंबई उच्च न्यायालय सहकारी अधिकाऱ्यांच्या सहयोगाने लांजा येथील गरजू मुलांना दत्तक पालक योजनेतून पूर्ण शिक्षणाची उचलली जबाबदारी.
लांजा: प्रतिनिधी दिपक मांडवकर
लांजा: मंगळवार दिनांक २९ जून २०२१ रोजी लांजा येथे समाजसेवक लांजा तालुक्यातील गवाणे गावचे सुपुत्र श्री. चंद्रकांत करंबेळे आणि मुंबई उच्च न्यायालय सहकारी अधिकाऱ्यांच्या सहयोगाने लांजा येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा रामाणे वाडी येथिल गरजू मुलांना व अतिशय गरीब व गरजू विद्यार्थी कु. दुर्वांश योगेश रामाणे याच्या घरी जाऊन दत्तक पालक योजनेतून आर्थिक साहाय्य केले. व पूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली. ग्रामीण भागापासून ते मुंबई पर्यंत विविध क्षेत्रात निस्वार्थी सहकार्य करणारे व्यक्तिमत्व म्हणून निराधारांचा आधार बनत आहेत. कोरोना काळात देखील मृत्यू झालेल्या व पालकतत्व हरपलेल्या कुटुंबातील व्यक्तीना विविध सहकार्य केले आहे. या मदत सहकार्य स्थळी त्या विद्यार्थी मुलाचे आजोबा श्री. तुकाराम रामाणे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. विजय बंडगर, माजी उप सभापती सुभाषजी रामाणे, जि. प. पूर्ण प्राथमिक गावणे शाळा क्र. १ मुख्याध्यापक श्री. नथुजी सोनवणे, शिक्षक श्री. विजय कोळी व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते, सदर कार्याला सर्व क्षेत्रातुन शुभेच्छा येत असून श्री. चंद्रकांत करंबेळे गरजूनचा आधार बनत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा