युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

 


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) 

         युवासेना प्रमुख, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपत्कालीन सेवा केंद्राचे अध्यक्ष रामदास साळवी यांच्या वतीने घाटकोपर स्थानक, जीवणज्योत हॉस्पिटल समोर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिर पार पडले.या शिबिराला युवा कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. ७६ युवकांनी  रक्तदान करत आपले कर्तव्य निभावले. या शिबिराला शिवसेना विभाग प्रमुख राजेंद्र राऊत, उप विभाग प्रमुख सुनील मोरे, शाखाप्रमुख नाना ताटेले, मनसे उपविभाग अध्यक्ष निलेश जंगम, नगरसेवक बाबा हांडे, पत्रकार अनिल गलगली आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्याना प्रमाणपत्र देत सन्मानीत करण्यात आले.

टिप्पण्या