जागतिक पर्यावरण दिनी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, शाखा तालुका वसई संलग्न कुणबी युवा मंडळ, वसई-विरार आणि कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, शाखा तालुका वसई संलग्न कुणबी युवा मंडळ, वसई-विरार आणि मानवेलपाडा सामाजिक संघटना यांच्या वतीने वृक्षारोपण सोहळा संपन्न
विरार: प्रतिनिधी दिपक मांडवकर
विरार: रविवार दिनांक ६ जून रोजी विरार येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई, शाखा तालुका वसई संलग्न कुणबी युवा मंडळ, वसई-विरार आणि मनवेलपाडा सामाजिक संघटना विरार यांच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखावा या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या ठिकाणी वसई- नालासोपारा-विरार मधील सर्व समाज बांधवांनी उपस्थिती दाखवली तर विरार पूर्व येथे टेपाचा पाडा येथे विविध आणि खास करून जास्त प्राणवायू देण्याऱ्या झाडांची लागवड केली. त्यात पिंपळ, चिंच, काजू, आवळा, फळस, करंज इत्यादी ७० वृक्षांची लागवड करुन निसर्गाचा समतोल राखला. तर ही संघटना गेली चार वर्षे या विरार परिसरात पर्यावरण दिनी सातत्याने झाडांची लागवड करत आहेत. तर नुसती लागवड न करता त्या झाडांची निघा सुद्धा राखत आहेत. या वृक्षारोपण कार्यक्रमास समाज सेवक श्री. किशोर भेरे, माजी. नगरसेविका सौ. संगीता भेरे, कुणबी सामाजोन्नती संघ वसई तालुका अध्यक्ष श्री. अनंत फिलसे. दिलीप बडबे, संभाजी मालप, शैलेश दळवी, अरुण शांताराम ठोंबरे, संदिप मांडवकर, विलास सुवरे, अविनाशजी, गिरीधर काप, विनायक निंबरे, सुनीलजी रेवाळे, नरेश पांडुरंग धोकटे, एकनाथ डिंगणकर, दीपक चौगुले, शैलेश बामणे, गंगाराम घडशी, यशवंत भानसे, तेजश्री रांगळे, किशोर पावसकर, सौवराज अविनाश पाचकले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा