लोकशाहिच्या चौथ्या स्तंभाला श्रीमती दिव्या ढोले यांच्यातर्फे अन्नधान्यसह मास्क व सँनिटायझरचे वाटप

 



मुंबई(शांत्ताराम गुडेकर ) 

             कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत आहे. अंधेरी पश्चिम  येथील सामाजिक कार्यकर्त्यां  श्रीमती दिव्या ढोलेही याला अपवाद नाहीत. त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात दिला. आजही देत आहेत. याचाच एक भाग म्हणून संकल्प सिद्धी ट्रस्टच्या विश्वस्त श्रीमती दिव्या ढोले यांच्या सहकार्याने व जर्नालिस्टस युनियन आँफ महाराष्ट्र चे भिमराव धुळप, नारायण पांचाळ यांच्या सहयोगाने संकल्प सिध्दी ट्रस्टतर्फे लोकशाहिचा चौथा स्तंभाला अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील दिव्या ढोले यांच्या जनसंपर्क कार्यालयात अन्नधान्य व मास्कसह सँनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी मुंबई पत्रकार संतोष शिंदे,भागूराम सावंत, एस.एल. गुडेकर यांच्यासह विविध प्रिंन्ट व इले.मिडियाचे अनेक पत्रकार बांधव उपस्थित  होते.

टिप्पण्या