तर लुटमारीस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळ फासलं जाईल - श्री अविनाशदादा लाड यांचा प्रशासनाला इशारा


कोरोनाच्या नावाखाली लांजा-राजापुरात खाजगी डाँक्टरांकडून लुट वाढली

श्री अविनाशदादा लाड यांचे रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

लांजा ( दिपक मांडवकर)  - लांजा राजापुरातील जनता कोरोना महामारीमुळे त्रस्त झाली आहे,अनेकांना मृत्युला सामोरे जावे लागत आहे,अशावेळी काही सरकारी अधिकारी पेशंटकडून वसुलीचे धोरण ठरवित असून ही सामान्य माणसांची फसवणुक चालली आहे.अधिकारी वर्गाने अशीच लुटमारीची भूमिका ठेवल्यास त्यांना भर चौकात काळे फासले जाईल असा इशारा काँग्रेसनेते, लांजा-राजापूर-साखरपा विभागप्रमुख मा.श्री अविनाशदादा लाड यांनी प्रशासनाला दिला आहे.

   लांजा विभागातील कोरोना पेशंटचे अनेक नातेवाईक आमच्याशी आलेल्या  बीलांबाबत आवाज उठवा म्हणुन फोनवरुन संपर्क करीत आहेत. त्यांची ही विनंती प्रशासन लुट करीत असल्याचाच एक भाग आहेत,त्यामुळे लांजा राजापुरच्या आरोग्य व्यवस्थेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सर्दी,ताप,कप असे पेशंटही कोरोनाच्या नावाखाली जमा करीत असल्याचे लोक सांगत आहे.त्यामुळे कोरोना पेशंटच्या नावाखाली गिऱ्हाईक शोधत लोकांकडून जास्त रक्कम वसुल करत असल्याचे सांगत आहेत.कर्मचारी  लोकांच्या मनात कोरोनाबाबत जागृती न करता भिती  दाखवित आहेत.विनाकारण भितीमुळेच अनेक जण दगावत असल्याचे सांगत आहे.त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास लोकांच्या जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

    लांजा राजापूरात अनेक  ठिकाणी सरकारी कोविड

सेंटर उभे केले आहेत.मात्र या कोविड सेंटरच्या कामाबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे.तेथील कर्मचारीच पेशंटच्या नातेवाईकावर दबाव टाकून खाजगी कोविड सेंटर्समध्ये भरती करण्यास प्रवृत्त करीत आहेत.असा घृणास्पद प्रकार सध्या लांजा-राजापुरच्या जनतेच्या बाबतीच घडत आहेत.काही खाजगी कोविड सेंटर्समध्ये काही लोकप्रतिनिधींचीच गुतवणुक असल्याची चर्चा चालू आहे.या गुंतवणुकीत जास्त नफा या खाजगी कोविड सेंटर्सना करुन देण्याचे या लोकप्रतिनिधींनी जबाबदारी घेतली असल्याचा आरोप होत आहे.त्यामुळेच या खाजगी कोविड सेंटर्सचे बील 65-70 हजाराच्या घरात लावले जात आहे.

    राज्य सरकारने खाजगी हाँस्पीटलना कोरोना पेशंटचे दर निश्चित केले आहेत.मात्र याबाबत या खाजगी डाँक्टरांना बिलाबाबत विचारणा केली असता त्यांनाच शासनाचा आदेश काय आहे माहीत नाही,शिवाय आदेश येईल तेव्हा बील कमी करु अशी भुमिका हे डाँक्टर घेत आहेत.लांजा राजापुरात सर्वसामान्य शेतकरी जनता राहत आहे.येथील अनेकजण गरीब आहेत.त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.अशा लोकांनी कसे बिल भरायचे,त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी या लुटमारिवर नियंत्रण ठेवावे,तसेच खाजगी कोविड सेंटर्सकडून देण्यात आलेल्या बिलांची चौकशी करुन पैसे परत मिळवून द्यावेत अन्यथा येत्या काळात लुटण्यास प्रवृत्त करणाऱ्यांच्या भर चौकात त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा काँग्रेसनेते अविनाशदादा लाड यांनी आज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना ईमेलद्वारे पत्र देत दिला आहे.

टिप्पण्या