भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष कमांडर कै. दत्ताजी साळवी यांना १०३ व्या जयंतीनिमिताने श्रध्दांजली अर्पण

 


मुंबई: शांताराम गुडेकर

           शिवसेनेचे झुंजार कामगार नेते, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष कमांडर कै. दत्ताजी साळवी यांच्या १०३ व्या जयंती निमित्त ईशान्यमुंबई विभाग क्र. ८ चे विभागप्रमुख श्री. राजेंद्र राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर पूर्व च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी उपविभागप्रमुख चंद्रपाल चंदेलिया, संजय दरेकर, शाखाप्रमुख अजित गुजर, मयुरेश नामदास, सह संघटक नरेश माटे, अजित भायजे, राजेश खरात, युवासेनेचे विशाल चावक, लोकेश फेपडे, स्वप्नील सावंत, कुणाल पाटील, चित्रपट सेनेचे, भूषण चव्हाण, माजी उपविभागप्रमुख, प्रकाश वाणी, कार्यालय प्रमुख दिनकर मांडले, श्री. मढवी, पत्रकार सचिन भांगे आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या