आजपासून शील फाउंडेशन आयोजित " बॅटल ऑफ हुनर" ऑनलाईन गायन स्पर्धेचा शुभारंभ
मुंबई(शांत्ताराम गुडेकर )
शील फाउंडेशन आयोजित बॅटल ऑफ हुनर ऑनलाईन गायन स्पर्धा आजपासून(दि,११जून २०२१)पासून सुरु होत असून इच्छुकांनी स्पर्धेसाठी आपल्या सुरेल आवाजाचा व्हिडिओ https://www.sheilfoundation.com/battle-of-hunar/ या लिंकवर पाठवावा . अधिक माहितीसाठी ८०९७६८१७२०/२१ संपर्क करावा . व्हिडिओचा कालावधी हा जास्तीत जास्त ३ मिनिटे असला पाहिजे तसेच २० एमबी पेक्षा कमी साईजचा व्हिडिओ पाठवावा. त्यापेक्षा वरील व्हिडिओची वेळ आणि साईज ग्राह्य धरली जाणार नाही. प्रत्येक गायकाने (स्पर्धकाने) स्वतःचा एक व्हिडिओ शूट करून पाठवावा. दोन स्पर्धक किंवा ग्रुप व्हिडीओ स्वीकारला जाणार नाही.स्पर्धा तीन गटात होणार असून पहिला वयोगट ७ ते १५ वर्षे असा आहे.यामध्ये विजेत्यांना प्रथम पारितोषिक - २५०००/-रु. आणि ट्रॉफी,द्वितीय पारितोषिक - १५०००/- रु.आणि ट्रॉफी,तृतीय पारितोषिक - ५०००/-रु. आणि ट्रॉफी असेल तर दुसरा वयोगट १६ ते ३० वर्षे असून विजेत्याला स्वतःचा स्वतंत्र म्युझिक अल्बम तयार करण्याची सुवर्णसंधीसह प्रथम पारितोषिक - ५००००/- रु,आणि द्वितीय पारितोषिक - २५०००/- रु,तृतीय पारितोषिक - १००००/- रु.असे आहे. तिसरा वयोगट ३१ आणि अधिक वर्षे असा आहे.यामधील विजेत्यांना प्रथम पारितोषिक - २५०००/- रु. आणि ट्रॉफी
द्वितीय पारितोषिक - १५०००/- रु. आणि ट्रॉफी
तृतीय पारितोषिक - ५०००/- रु आणि ट्रॉफी आसे असून बॅटल ऑफ हुनर स्पर्धेसाठी गायन क्षेत्रातील नामवंत गायक परीक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडणार आहेत.तरी इच्छुकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा