युवा सेना प्रमुख नामदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त नालासोपारा नागीनदास पाडा परिसरातील सुमारे १५० कुटुंबाना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नालासोपारा: दीपक मांडवकर
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, वातावरण बदल, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री माननीय. नामदार. श्री. आदित्यजी उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना जिल्हा सचिव भूमिष सावे यांच्या मार्गदर्शनाने व नालासोपारा विधानसभा अधिकारी रोहन शिरीष चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली नालासोपारा युवासेना शहर सचिव नितेश कुवेसकर यांच्या वतीने तुळींज, नगीनदास पाडा-मोरेगाव परिसरातील सुमारे १५० कुटुंबाना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे युवा नेतृत्व पंकज देशमुख, शिवसेना शहरप्रमुख प्रदीप सावंत, उपशहर प्रमुख नरेश जाधव, उपविभाग प्रमुख संदीप चौगुले, शाखाप्रमुख सिद्धार्थ मोरे, माजी शाखाप्रमुख नामदेव कुवेसकर, शहर कार्यकारणी सदस्य बाळकृष्ण येरापल्ले, समाजसेवक संतोष कदम, युवासेना उपशाखाअधिकारी अनंत शिंदे, रुपेश महिडा, ऋषिकेश खामीतकर,शिवसैनिक सचिन पालकर, रत्नाकुमार राणे, खाशाबा पवार, तिवरेकर युवासैनिक सुरज कुवेसकर, विवेक शिरीसकर, केदार रासम, उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा