कुणबी समाज विकास संघ (रजि.) मुलुंड यांच्यावतीने रक्तदान शिबिर उत्साहात पार
मुंबई: दिपक मांडवकर
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालय मध्ये व रक्तपेढी असणाऱ्या रक्ताचा तुटवडा व रक्ताची गरज लक्षात घेऊन व जागतिक रक्तदिनाचे औचित्त साधून एक दिवस अगोदर कुणबी समाज विकास संघ( रजि.) मुलुंड संलग्न कुणबी समाज युवक मंडळ, महिला मंडळ यांच्या वतीने व स्नेहा कॅटरेसचे मालक सन्मानीय श्री संजयभाऊ माळी यांच्या विशेष सहकार्याने रविवार दिनांक १३ जून २०२१ रोजी सकाळी ९.०० ते संध्याकाळी २.०० चंदनबाग मुलुंड पश्चिम येथे कोरोनाच्या महामारी मध्ये शासनाचे सर्व नियम काटेकोर पाळून मंडळाच्या सदस्यांनमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिराला बहूसंख्येने सदस्य रक्तदाते व मुलुंड मधील व आजूबाजूच्या परिसरातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती. कुणबी समाज विकास संघ (रजि) मुलुंड मंडळाचे मार्गदर्शक व मा.अध्यक्ष श्री उमेशजी पाटील तसेच विद्यमान अध्यक्ष श्री विनायकजी घाणेकर व संतोष अबगुल प्रतिष्ठानचे श्री संतोषजी दादा अबगुल, कुणबी समाज पथपेढीचे अध्यक्ष श्री. तानाजी निकम, युवक मंडळाचे युवाध्यक्ष श्री आशिष पाटील, वधुवर सूचक मंडळाचे अध्यक्ष सन्मानीय श्री शंकर बाईत, महिला अध्यक्षा सन्मानीय सौ करुणाताई गावडे सचिव सौ प्राचीताई पाटील तसेच ब्लड लाईन रकपेढी चे हरमित सिंग कोहली सर, युवक मंडळाचे युवाउपाध्यक्ष श्री प्रवीण शिबे आदी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून तसेच महामानवांच्या प्रतिमेला पुष्पमाळा अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली .
कुणबी समाज विकास संघ (रजि.)मुलुंड, संलग्न कुणबी समाज युवक मंडळाच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून जवळ जवळ आठ वेळा सातत्याने मुलुंड विभागात रक्तदान शिबीर आयोजित करून गरजुंना गरजेच्या वेळी विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून जवळ जवळ १२० गरजूंना रक्तपिशव्या उपरोक्त मंडळाच्या वतीने विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळामध्ये शासनाच्या सूचनेनुसार व राज्यात रक्तपेढी मध्ये होणाऱ्या रक्ताचा तुटवडा व रक्ताची गरज लक्ष्यात घेऊन व कोरोनाच्या काळात सुद्धा तीन वेळा रक्तदान शिबीर आयोजित करून समाज कार्यात मोलाचे सहकार्य केलेलं आहे. सर्व युवा कार्यकर्ते यांच्या कठोर मेहनतीने व नियोजनाखाली यशस्वी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरामध्ये १०० पेक्षा जास्त युवक सदस्यांनी आपला सहभाग नोंदवून जवळ जवळ ७२ पेक्षा जास्त पिशवी रक्त ब्लडलाईन ठाणे, ह्या रक्तपेढीच्या सहकार्याने संकलित करण्यात आले. तसेच या प्रसंगी आपल्या आयुष्यात सलग ५१ वेळा रक्तदान करणारे युवा जेष्ठ कार्यकर्ते श्री संतोषदादा भोजने यांना मंडळाच्या वतीने श्रीफळ, पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. सदर शिबिरामध्ये संतोष अबगुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बच्चू दादा हुमणे कुणबी समाज १८ गाव गटाचे सचिव श्री नरेश घरटकर, राजेंद्र विचले, राजेश राऊत, तसेच राजे शिवछत्रपती कोंकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रदीप घाणेकर सचिव मनीष लोंढे, तसेच डॉ. बाबुलाल सिंग, डॉ. सचिन बाबुलाल सिंग, कुणबी समाज मुलुंड मंडळाचे जेष्ठ कार्यकर्त श्री अनंत कदम, श्री सुरेश लोखंडे, आत्माराम सनगळे, महेंद्र उके, रविंद्र मांडवकर, प्रकाश म्हादलेकर, विजय गोवळे किरण कदम व माजी महिलाअध्यक्ष सौ पूजा ताई झाटे व सर्व युवा/ युवती कार्यकर्ते तसेच महिला मंडळ कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे सांगता वरिष्ठ मंडळाचे सचिव श्री अरविंद म्हादळेकर, युवा सचिव श्री विनायक मांडवकर यांनी आलेल्या रक्तदात्यांचे व मान्यवरांचे सत्कार व आभार प्रदर्शन करून केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा