नित्यानंद सेवा मंडळाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न, ७५ प्रकारची लावली विविध प्रकारची झाडांचे रोपण

 



मुंबई(शांत्ताराम गुडेकर) 

            जोगेश्वरीच्या नित्यानंद सेवा मंडळाने नुकताचा वृक्षारोपण उत्सवाचा अनोखा कार्यक्रम साजरा केला. आरे कॉलनी, गोरेगाव येथे मंडळाच्या तब्बल ७० आबालवृद्ध, तरुण, महिला कार्यकर्त्यांनी या वृक्षारोपणात भाग घेतला. ७५ अधिक विविध जातींच्या वृक्षांची रोपे यावेळेस लावण्यात आली.

जोगेश्वरीतील नित्यानंद सेवा मंडळ आपल्या अनोख्या सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या सामाजिक कार्यातून त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवलेला आहे. याच सामाजिक कार्याचा एक भाग म्हणजे वृक्षारोपण उत्सवाचा कार्यक्रम. आरे कॉलनीतील खांडवे बंधू वाडीसमोर हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ५ वर्षाच्या चिमुरडीसह ते ७७ वर्षांच्या आजोबांपर्यंत सगळ्या वयोगटातील ७० हून अधिक स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.यावेळी ७५ हून अधिक रोपांची लागवड करण्यात आली. आंबा, चिकू, फणस, काजू, आवळा, पेरू, जांभूळ, लिंबू, कडुलिंब, दालचिनी, बेल, रतांबा अशा फळांची कलमी रोपे लावण्यात आली आहेत. अजित शिगवण यांनी दापोलीहून ही कलमी रोपे पाठवली होती. ६ कार्यकर्त्यांचा एक गट प्रत्येकी एका रोपाचे संवर्धन करणार आहे. त्याचप्रमाणे ज्या वाडीत हे वृक्षारोपण करण्यात आले त्या वाडीचे खांडवे बंधू हे देखील या रोपांची काळजी घेणार आहेत.या झाडांचे संवर्धन करुन येणारी फळे आदिवासी महिलांच्या उपजिविकेचे साधन ठरतील हा उदात्त हेतू ठेवून ही झाडे लावण्यात आली आहेत. या उपक्रमास बंडुदादा खांडवे यांच्यासह अरविंद भाई छेडा, निरंजन आहेर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले अशी माहिती नित्यानंद सेवा मंडळाचे रमेश गावडे यांनी दिली.

टिप्पण्या