महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री. दादाजी भुसे यांची युवा सेना पालघरने भेट घेऊन केली चिकू विमा हफ्ता पूर्ववत कमी करण्याची मागणी

 


विरार: दिपक मांडवकर

          महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नाम. श्री. दादाजी भुसे यांची युवा सेनेचे सहसचिव मयूर कांबळे व पालघर जिल्हा सचिव श्री. भूमिष सावे  यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन पंतप्रधान फळ बिमा योजने अंतर्गत चिकू फळपिकाच्या विमा हफ्त्याची अन्याय्य दरवाढ रद्द करण्याबाबत निवेदन दिले. चिकू विम्याचा हफ्ता गतवर्षीच्या हेक्टरी ३००० रुपयांवरून यावर्षी थेट १८००० रुपये करण्यात आली आहे. तो पूर्ववत हेक्टरी ३००० करावा तसेच "तौक्ते" चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी, ही मागणी करून पत्र वेवहार करून कृषिमंत्र्यांना निवेदन करण्यात आले.

टिप्पण्या