नगरसेवक श्री. किशोर नाना पाटील आणि बहुजन विकास आघाडीच्या वतीने एकता रहिवासी संघ मोरेगाव स्मशान भूमी परिसर पिण्याच्या पाण्याचा लोकार्पण सोहळा संपन्न

 


नालासोपारा ( प्रतिनिधी दीपक मांडवकर) 

वसई : नालासोपारा पूर्व विभागातील मोरगाव येथील माजी नगरसेवक श्री. किशोर नाना पाटील  यांच्या प्रयत्नाने वार्ड क्रमांक ३८ मध्ये एकता रहिवासी संघ मोरेगाव स्मशान भूमी परिसर पिण्याच्या पाण्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. वसई विरार महानगरपालिका अंतर्गत अधिकृत पाणी सुविधा बहुजन विकास आघाडी लोकनेते आमदार श्री हितेंद्र ठाकूर आमदार क्षितीज ठाकूर प्रथम महापौर राजीव पाटील माजी उपमहापौर उमेशजी नाईक यांच्या आशीर्वादाने आणि मा. नगरसेवक श्री. किशोर नाना पाटील यांच्या प्रयत्नाने  मोरेंगावतील रहिवास्यांची ही महत्त्वाची गैरसोय दूर झाली. द्वारका नगर मित्र मंडळ आबा निवास चाळ  सुरजचाळ  जीवदानी कॉलनीचाळ जीवदानी महाराष्ट्र पार्वती संयुक्त चाळ शिवप्रसाद कल्याणकर चाळ या परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक श्री. किशोर नाना पाटील यांचे जाहीर आभार मानण्यात आले. तर आम्ही सर्व रहिवासी सदैव आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.

टिप्पण्या