आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुप मार्फत वशेणी गावातील गरजु लोकांना धान्य वाटप
मुंबई(शांत्ताराम गुडेकर)
शिवसेना ५५ वा वर्धापनदिनाचे औचित्य साधून आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाटसअप ग्रुप मार्फत मु.पो.वशेणी ता.उरण जि.रायगड या गावातील गरजु लोकांना धान्य वाटप करण्यात आले तसेच आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपचे सभासद श्री.लवेश म्हात्रे यांना ग्रुपच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना या व्हाटसअप ग्रुपतर्फे एकत्र आणण्याचे काम केले ते या ग्रूपचे संस्थापक, संचालक श्री.संतोष पाटील यांचा देखील ग्रूप सदस्यांकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ग्रूपमधील सुर्यकांत कडू, रविंद्र जाधव, दिलीप गावडे, यशवंत खोपकर, वसंत सोनावणे, अनील कांबळे, गणेश काळे, दत्तात्रेय घुले, प्रविण कोरपे, अशोक कोळंबकर, हेमंत पाटील, दिलीप पाटील, प्रविण कुडेकर, जितेंद्र जैन, आप्पा कुलकर्णी यांच्यासह सदस्य व सभासद तसेच शिव सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा