कुणबी युवा संगमेश्वर आयोजित गरजुना एक हात मदतीचा हा उपक्रम विरार येथे संपन्न

 


विरार: प्रतिनिधी दीपक मांडवकर

          रविवार दिनांक १३ जून २०२१ रोजी विरार येथे कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका संगमेश्वर संलग्न कुणबी युवा संगमेश्वर आयोजित (एक हात मदतीचा) हा उपक्रम संपन्न झाला. दोन वर्षे लाँकडाऊन असल्यामुळे मुंबई शहरात रोजंदारी करणाऱ्या नागरिकांचा रोजगाराच बंद झाला आहे. अनेक नागरिक पुर्वी छोटी मोठी  कामे करुन रोजगार मिळवत होते. मात्र या लाकडाऊनमुळे अनेकांची जमविलेली पुंजी संपू लागली आहे. लाँकडाऊन संपेल याची वाट पाहीली जात आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. परिणामी किराणा भरण्याचाही प्रश्न उद्भवत आहे. अशा वेळी कुणबी युवा संगमेश्वर यांनी एक हात मदतीचा हा उपक्रम घेतला. या उपक्रमाचा पहिला टप्पा दिवा, मुंबई येथे यशस्वी झाल्यानंतर  दुसरा टप्पा आज रविवार दि. १३ जून २०२१ रोजी विरार येथे पार पडला. यावेळी जवळ जवळ ८५ कुटुंबांना किराणा किट चे वाटप करण्यात आले. यावेळी कुणबी युवा संगमेश्वर चे उपाध्यक्ष संदीप गीते, संदीप धुळप, खजिनदार श्री सुरज ओकटे, मुख्य संघटक श्री प्रभाकर धनावडे, कुणबी युवा मुंबईचे सेक्रेटरी श्री युवराज संतोष सर, प्रचारक सचिन रामाणे, संपर्क प्रमुख शैलेश दळवी, प्रशांत बेंडल, कार्यकारणी सदस्य मनोहर पड्यार, विशाल माईन, प्रदीप सापते तसेच वसई-विरार विभागातील सतत कार्यरत असणारे कुणबी युवा कार्यकर्ते श्री परेश शीतप, श्री धनावडे सर, श्री विकास डांगे सर, श्री अमित दळवी, भावेश कदम, श्री संतोष तोरस्कर, कल्पेश मायनाक, निलेश शिगवण, गणेश रंबाडे, अमित डिके, तसेच ज्यांनी जागेची उपलब्धता करून दिली असे एकदंत कोचिंग क्लासेस चे संचालक आपले समाज बांधव श्री प्रदीप तोरस्कर, त्याचबरोबर शाखा तालुका वसई चे संघटक श्री अनंत फिलसे, कुणबी युवा वसई विरार चे अध्यक्ष अविनाश पाचकले, समाज सेवक श्री कीशोर भेरे, श्री सुनील रेवाळे, श्री विलास सुवरे, श्री अरुण ठोंबरे  कुणबी समाजाचे पत्रकार श्री दीपक मांडवकर, सम्यक मैत्री फाउंडेशन ज्यांनी या कार्यक्रमासाठी २६ किट ची मदत केली त्यांचे श्री अरुण मांडवकर, प्रमोद पवार, परशुराम गावडे आणि समाज बांधव उपस्थित होते. या उपक्रमावेळी गरजूंना मदत करताना कुणबी युवा चे कार्यकर्ते, तसेच समाज बांधव भावुक झाले होते. या समाजपयोगी उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.  या उपक्रमाचा पुढील टप्पा मुंबई उपनगर, आणि संगमेश्वर तालुका ग्रामीण या ठिकाणी देखील घेतला जाईल. 

या उपक्रमास मदत करणारे देणगीदार, सहकार्य करणारे समाज बांधव यांचे मनःपूर्वक आभार मानले.

टिप्पण्या