शिवसेना ५५ व्या वर्धापनदिना निमित्त शिवसेना-युवासेना नालासोपारा शहर (पू.) च्या वतीने नारायणचंद्र ट्रस्ट बाल अनाथाश्रम व वृद्धाश्रमातील बालकांना व ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
नालासोपारा : दिपक मांडवकर
शिवसेनेचा ५५ व्या वर्धापन दिनाचे अवचित्य साधून युवासेनचे कार्यकुशल, मितभाषी शहर सचिव श्री. नितेश नामदेव कुवेसकर यांनी त्यांच्या जन्मदिनानिमित्त " नारायणचंद्र ट्रस्ट" बाल अनाथाश्रम व वृद्धाश्रमातील बालकांना व ज्येष्ठ नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या स्तुत्य कार्यक्रमास शिवसेना जिल्हा सचिव हेमंत पवार, नालासोपारा शहर प्रमुख प्रदीप सावंत, युवासेना विधानसभा अधिकारी रोहन शिरीष चव्हाण, शाखा प्रमुख मनोहर पाटील, माजी शाखाप्रमुख नामदेव कुवेसकर, उपशाखाप्रमुख विजय कुवेसकर, शिव गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र राऊळ, विशेष कार्यकारी अधिकारी रोहित शेलार, व्हिजन कॉम्पुटर'स चे संस्थापक संतोष मोहिते सर, शिव सेवा ट्रस्टचे सचिव राकेश जव्हेरी, शिवसैनिक यशवंत वरे, सुनिल रावणंग, युवासैनिक सुरज कुवेसकर, विवेक शिरीसकर हे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा